जुगार अड्ड्यावर छापा, रोख रक्कम व मोटरसायकल, ट्रॅक्टरसह ५ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल जप्त
1 min read
टेंभुर्णी राहुल आत्राम, परी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस ठाणे यांना बातमीदार मार्फत बातमी मिळाली की मौजे पिंपळनेर गावचे हद्दीत ठोंबरे यांच्या शेतात चिंचेचे झाडाखाली पत्त्याचा क्लब चालू असून त्यामध्ये बावन पत्त्याचा रमी जुगार हा ट्रॅक्टरच्या बॅटरीचे लाईटचे उजेडा दहा ते बारा इसम खेळत आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता दिनांक 13/5/2026 रोजी 20/30 वाजता गेले असता चिंचेच्या झाडाखाली दहा ते बारा इसम हे ट्रॅक्टरच्या बॅटरीतून वायर जोडून त्यातून लाईट घेऊन लाईटच्या उजेडात गोलाकार बसून पत्त्याचा डाव खेळत होते त्यावेळी पोलीस पथक हे पायी जात असताना जुगार खेळण्याकरिता बसलेले लोकांना संशय आल्याने ते अंधाराचा फायदा घेऊन बाजूस असलेल्या उसातून व डाळिंबाचे बागेतून पळून गेले. जुगार खेळलेत असलेल्या ठिकाणी 52 पत्त्याचे सहा डाव, आकडेमोड करण्यासाठी वही, एक निळ्याशाहीचा बॉलपेन व रोख रक्कम 2200/-रुपये व त्यांच्या एकूण 9 मोटरसायकली, लाईट उजेड करणे करता वापरण्यात आला स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर इत्यादी सर्व मिळून किंमत 5,67,200/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तो गुन्ह्याच्या कामी जप्त केला आहे.
जुगार कारवाई संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल 1082 संभाजी चंद्रभान सोनवणे नेमणूक कुर्डूवाडी पोलीस ठाणे यांनी मोटरसायकलचे मालक व पळून गेलेले इसमांच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुणाचा तपास पोलीस हवलदार शिवाजी भोसले कुर्डूवाडी पोलीस ठाणे हे करीत आहे.
गुण्यातील जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकल व ट्रॅक्टर चे नंबर वरून वाहन मालकाचे नाव काढून आरोपीचे नावे निष्पन्न करणे बाबत तपास चालू आहे.
त्याचप्रमाणे राहुल आत्राम प्रभारी अधिकारी टेंभुर्णी यांनी *पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे त्वरित बंद करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आवाहन केले आहे*
सदरची कारवाई ही मा. अतुल कुलकर्णी , पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अंजना कृष्णा, मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक करमाळा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुल आत्राम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, प्रभारी अधिकारी टेंभुर्णी, कुर्डूवाडी पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, हवालदार शिवाजी भोसले व टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार दत्तात्रय पवार, ज्ञानदेव सरडे, निलेश काशीद, नितीन तळेकर, पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले, रशीद मुलानी, प्रकाश जगदाळे, संदीप साखरे यांनी केली आहे. तपासिक अंमलदार -हवालदार शिवाजी भोसले नेमणूक कुर्डूवाडी पोलीस ठाणे.