अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरवर निमगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी श्रीमती अंजना कृष्णा यांचे पथकाची कारवाई, चालक आणि ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात.
जनसंवाद/माढा दि.८ : सीना नदी पत्रातून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुक राजरोसपणे होत असताना उपविभागी पोलीस अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे. निमगाव (मा) येथे अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी बार्शी उपविभागाचे निर्भया पथक माढा हद्दीत गस्तीवर होते. अंजना कृष्णा यांनी बार्शी येथून पोलिसांचा फौजफाटा न मागवता निमगाव गावाजवळ गस्तीवर असलेल्या निर्भया पथकाला तात्काळ घटना स्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. निर्भया पथकाने सीना नदी पात्रातून वाळूने अर्धवट भरलेल्या डम्पिंग ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त करून पुढील कारवाईसाठी माढा पोलिसांच्या ताब्यात दिला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी करमाळा विभाग करमाळा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशाने निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी हे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता माढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग होते. निमगाव बंधाऱ्याजवळ सीना नदी पात्रात अवैद्य वाळू उपसा चालू असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी कडील पोहेकॉ /बाबासाहेब घाडगे,पोकॉ हनुमंत पाडुळे, चापोकॉ /भाऊसाहेब महानोर मपोकॉ/नम्रता गटकूळ या पथकाने तात्काळ मौजे निमगाव येथे बंधाऱ्यालगत सीना नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता एक विना नंबरचा लाल रंगाचा महिंद्रा डीआय ६०५ ट्रॅक्टर त्यास दोन चाकी डम्पिंग ट्रॉली वाळूने अर्धवट भरलेली मिळून आली आहे. सदर ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालक यास तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता माढा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे…… गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे…