जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कुठे झाली नियुक्ती

जनसंवाद | सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार तसेच आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

पोलिस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार एकूण १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचेकडून देण्यात आले आहेत.

 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नियंत्रण कक्ष, सोलापूर ग्रामीण, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, माळशिरस यांसह विविध ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे —

१) पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार

  • नियंत्रण कक्ष → अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे

२) पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे

  • वैराग पोलिस ठाणे → सोलापूर तालुका पोलिस ठाणे

३) पोलीस निरीक्षक दीपक ज्योतिराम पाटील

  • नियंत्रण कक्ष → मोहोळ पोलिस ठाणे

४) पोलीस निरीक्षक बाळू रसिक भरणे

  • वाहतूक शाखा → टेंभुर्णी पोलिस ठाणे

५) पोलीस निरीक्षक अमोल शंकर कादबने

  • नियंत्रण कक्ष → वैराग पोलिस ठाणे

६) पोलीस निरीक्षक दशरथ भानुदास वाघमोडे

  • पंढरपूर शहर पोलिस ठाणे → माळशिरस पोलिस ठाणे

७) पोलीस निरीक्षक तयूब युनूस मुजावर

  • पंढरपूर तालुका पोलिस ठाणे → पंढरपूर शहर पोलिस ठाणे

८) पोलीस निरीक्षक सुरेश गणपतराव चिल्लावार

  • अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे → पंढरपूर तालुका पोलिस ठाणे

९) पोलीस निरीक्षक विकास चन्नवीर दिंडुरे

  • माळशिरस पोलिस ठाणे → सायबर पोलिस ठाणे

१०) पोलीस निरीक्षक दीपक लक्ष्मण बरडे

  • नियंत्रण कक्ष → जिल्हा वाहतूक शाखा

११) पोलीस निरीक्षक कमलाकर नरसिंग गड्डीमे

  • नियंत्रण कक्ष → आर्थिक गुन्हे शाखा

१२) सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय आप्पासो सोनवणे

  • पंढरपूर तालुका पोलिस ठाणे → बार्शी तालुका पोलिस ठाणे (प्रभारी)

१३) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आण्णासाहेब कड

  • आर्थिक गुन्हे शाखा → सोलापूर तालुका पोलिस ठाणे

जिल्ह्यातील पोलिस प्रशासनातील या बदलांमुळे स्थानिक पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *