जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडीत पोलिसांचा रूट मार्च; दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

1 min read

कुर्डुवाडी, दि. १३ सप्टेंबर २०२६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच पोलिस यंत्रणेची सज्जता व कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने रविवारी शहरात रूट मार्च काढण्यात आला.

 

हा रूट मार्च कुर्डुवाडी शहरातील प्रमुख मार्गाने बाजारपेठ परिसरातून काढण्यात आला. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, कुर्डुवाडी येथील मैदानावर दंगा काबू पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.

 

या रंगीत तालीममध्ये संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीत प्रभावीपणे बंदोबस्त करणे, जमाव नियंत्रणात आणणे तसेच परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविणे याबाबत पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रत्यक्ष सराव करून देण्यात आला.

 

६० अधिकारी-अंमलदारांचा सहभाग

रूट मार्च व दंगा काबू पथकाच्या रंगीत तालीममध्ये कुर्डुवाडी पोलिस ठाण्याकडील ३ पोलिस अधिकारी, ३ श्रेणी पोलिस, ३० पोलिस अंमलदार तसेच २४ होमगार्ड, असे एकूण ६० अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

 

आगामी गणेशोत्सव काळात कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे या रूट मार्च व रंगीत तालीममधून स्पष्ट झाले आहे.

 

दरम्यान, नागरिकांनी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा, असे आवाहन कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *