जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

नवयुगाचा शिलेदार: उमेश सोनवणे यांची धाराशिव शिवसेना ( शिंदे गट ) वैद्यकिय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष पदी वर्णी 

20251021 023759

परांडा, दि.२० :  परांडा शहरातील खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे. हे नाव आहे उमेश भास्कर सोनवणे. कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

कार्याची दमदार ‘पार्श्वभूमी’: उमेश सोनवणे उच्चशिक्षित असून, शासकीय कामाचा अनुभव आहे. त्यांनी २०१६ साली परांडा नगर पालिकेची प्रभाग ८ मधून निवडणूक लढवली असून थोड्या मतांनी त्यांच्या पदरी निराशा  पडली होती. यावेळी प्रभाग १०अ  चे ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.  त्यांच्या मते राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नसून नागरिकांच्या समस्यांचे समाधान करणे आहे.

 

मजूर’ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लेखनी स्वरूपात सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला.

प्रशासकीय समन्वय स्तरावरील गुंतागुंतीची सरकारी कामे सामान्य नागरिकांसाठी सोपी करणे हा त्यांचा विशेष हातखंडा आहे. नागरिकांची शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची कार्यशैली प्रभावी ठरली आहे.

 

संकटात मदत: पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने किट आणि मदत पुरवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्या साठी त्याची शिवसेना जिल्हाअध्यक्ष ( भूम परंडा वाशी ) वैधकिय मदत कक्ष पदी वर्णो लागली .

युवकांचा ऑयकॉन: यांचा तरुणांमध्ये मोठा दांडगा संपर्क असून त्यांच्या साधेपणा आणि थेट लोकांशी संवाद साधण्याच्या शैलीमुळे ते युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत.

विकासाची नवी आशा: अभ्यासू आणि अनुभवी असलेल्या उमेश सोनवणे यांच्या कडे सामान्यजनता मोठी आशा ने पाहत आहे. स्थानिक राजकारणातील घराणेशाही आणि पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देत, ते एक विकासाभिमुख आणि पारदर्शक राजकारणाचा आदर्श घालून देण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या एका बदलत्या युगाचा आणि दुर्लक्षित भागाला न्याय मिळवून देणारा सक्षम प्रतिनिधी मिळेल अशी खात्री जनतेला वाटत आहे.

 

पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, माजी मंत्री आ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैधकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट राज्य संपर्क प्रमुख संचिन मांजरे पाटील याच्या प्रसिद्ध पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *