IPS अंजना कृष्णा यांचा कारवाईचा धडाका: निर्भया पथकाकडून पुन्हा एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त.
15/06/2026
जनसंवाद/माढा दि.१५: दारफळ सीना (ता.माढा) येथे गावालगत सीना नदीपात्रात जाऊन पाणी केली असता एक विना नंबरचा निळ्या रंगाचा न्यू हॉलंड ट्रॅक्टर त्यास दोन चाकी डम्पिंग ट्रॉली वाळूने भरलेली मिळून आली. सदर ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालक यास तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता माढा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. ही कारवाई बार्शी उपविभागाच्या निर्भया पथकाने केली.
सविस्तर वृत्त असे की, श्रीमती अंजना कृष्णा सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी करमाळा विभाग करमाळा यांचेकडे उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शीचा अतिरिक्त कार्यभार आहे. श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक बार्शी उपविभाग हे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता माढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. गोपनिय बातमीदारामार्फत अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची बातमी मिळाली होती.
दारफळ सीना गावाजवळ सीना नदी पात्रात अवैद्य वाळू उत्खनन व वाहतुकीची बातमी मिळाल्याने निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी कडील पोहेकॉ /बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, चापोकॉ /भाऊसाहेब महानोर यांच्या पथकाने तात्काळ दारफळ सीना येथे गावालगत सीना नदीपात्रात जाऊन पाणी केली असता एक विना नंबरचा निळ्या रंगाचा न्यू हॉलंड ट्रॅक्टर त्यास दोन चाकी डम्पिंग ट्रॉली वाळूने भरलेली मिळून आली सदर ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालक यास तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता माढा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यापूर्वीही याच पथकाने निमगाव माढा येथील बंधाऱ्यातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चालकास जेरबंद करून माढा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. निर्भया पथकातील पोहेकॉ बाबासाहेब घाडगे हे कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात नियुक्त असताना त्यांनी म्हैसगाव बीट अंमलदार म्हणून कामकाज केले आहे. कुर्डुवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत सीना नदी काठावरील अनेक गावांचा समावेश असल्याने श्री. घाडगे यांना वर्षानुवर्ष अवैध वाळू उत्खनन होत असलेल्या जागा, वाहतुकीचे मार्ग याबाबत माहिती असल्याने तात्काळ कारवाई करणे अधिक सोयीस्कर ठरत आहे.