जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

पोलीस उपनिरीक्षक १ लाख रुपये लाच प्रकरणी ACB ची कारवाई

1 min read
20260530 150303

अहिल्यानगर : नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरू केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामा व इतर 15 नातेवाईकांविरोधात दिनांक 11 मे 2026 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत होते.

दरम्यान, सदर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे 18 मे 2026 रोजी प्राप्त झाली होती.

त्यानुसार ACB कडून लाच मागणी पडताळणी करण्यात आली. पडताळणीवेळी तक्रारदार यांनी पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे जयेश गांगुर्डे यांची भेट घेतली असता त्यांनी तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आज तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच पोना/709 चंद्रकांत भिमसेन काळे, पोका/2579 किशोर विठ्ठल कुळधर व पोका/2262 शेखर बाळासाहेब वाघ यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे या करत आहेत.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले असून, लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed