श्री क्षेत्र जोतिबा यात्रेसाठी वाहतुकीबाबत निर्देश जारी
1 min read
जनसंवाद/संतोष वाघ: श्री जोतिबा मंदीर येथील यात्रा संपल्यानंतर मातोश्री लॉज ते दानेवाडी फाटा एकेरी वाहतूक सुरु राहील. दानेवाडी फाट्यापासून मातोश्री लॉजकडे जाणा-या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. मातोश्री लॉज यमाई पायरी क्र. 1 व 2 निलगिरी बाग लादे मळा या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहन चालकांनी दोनवाडी फाटा मार्गे माले फाटा/वाघबीळ मार्गे सोयीनुसार मार्गस्थ व्हायचे आहे.
क) जोतिबा यात्रेनिमित्त मोटार वाहन पार्किंग व्यवस्था :-
महत्वाची पार्किंग
मेन पार्किंग – मंदीराकडे जाणारे बुमजवळ – सासन काठी राखीव
सेंट्रल प्लाझा- ट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर व इतर मोठी वाहने
ड) गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग –
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग- यमाई मंदीराच्या पाठीमागे, बुने फार्म हाऊस, श्रावणी हॉटेल समोर रो हाऊस च्या पाठीमागे चढावर
ई) केर्ली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनासाठी पार्किंग : –
चारचाकी वाहनांसाठी पार्किंग- जुने एस.टी. स्टेंड समोर MTDC वळणावर, पिराचा कडा, तोरणाई कडा, नवीन एस.टी. स्टैंड च्या पाठीमागे, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 1, जुने आंब्याचे झाड डावी बाजु क्र. 2, नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस डावी बाजू, गायमुख इनाम पार्किंग व शेवताई
दुचाकी वाहनांसाठी पार्किंग- MTDC समोर, टोल नाक्याच्या बाजुला तळ्याजवळ, नवीन आंब्याचे झाड फार्म हाऊस उजवी बाजू
वाडी रत्नागिरी श्री जोतिबा मंदीर या ठिकाणी यात्रेकरीता येणा-या भाविकांसाठी वरील प्रमाणे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून भाविकांनी नमुद पार्किंगच्या ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत इतर कोणत्याही ठिकाणी /रहदारीच्या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात येत आहे.प्रथम डोंगरावरील पार्कीग भरल्यानंतर डोंगर पायथ्याची पार्कंग ठिकाणे भरली जातील. डोंगर पायथ्याशी वाहने पार्क करुन डोंगरावर जाण्यासाठी मोफत बसची सोय केलेली आहे.
वाहतुकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद हे नियमन 30 मार्च रोजी रात्री 8 वा. पासून ते 1 एप्रिल रोजी रात्री 11 वा. पर्यंत करण्यात येत आहे. तसेच वाहनांची गर्दी व घाट मार्गातील परिस्थिती आणि डोंगरावरील पार्किंगची परिस्थिती पाहून वाहतूक चालू किंवा बंद करण्याचा अधिकार यात्रा बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाहतूक तसेच पार्किंगमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.