जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

1 min read
20260224 131957

जनसंवाद/संतोष वाघ : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे साहित्यिक व सामाजिक तसेच शिक्षक, कवी व विविध क्षेत्रातील बंधू-भगिनीना ‘जोशाबा आदर्श सन्मान पुरस्कार कै. विठ्ठलराव शिंदे सभागृह कुर्डुवाडी येथे रविवार ५ एप्रिल २०२६रोजी सकाळी ११ वाजता प्रदान करण्यात येणार असून या आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

        जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था चिंचोली तर्फे आयोजित या पुरस्काराचे हे ४थे वर्ष असून हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे. आपल्या शैक्षणिक, साहित्यिक, कवी, शेतकरी, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील कार्याचे प्रस्ताव दि. ३० मार्च पर्यंत वरील पत्यावर पाठवायचे आहे. जिल्ह्यातील शिक्षक, साहित्यिक, कवी, कला क्रीडा सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

         पुरस्काराचे स्वरुप आकर्षक स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पेन असे असून तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. प्रस्ताव एका प्रतीत व दोन रंगीत छायाचित्रासह बाळासाहेब देवकुळे द्वारा जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, चिंचोली तालुका माढा जिल्हा सोलापूर पिन ४१३२०८ या पत्त्यावर पाठवावा, असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

         अधिक माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे ९७३०१०३४८६, खजिनदार आबासाहेब खंडाळे ९५५२७८४९४२, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अंकुश आतकर ९८६०३४१३९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *