ताज्या बातम्यामाढा-करमाळायशोगाथाशैक्षणिक- नोकरीसोलापूर जिल्हा

सिद्धी भिसेचे एल.एल.बी परीक्षेत यश.

कुर्डूवाडी दि.२०: येथील सिद्धी शामसुंदर भिसे हिने नुकत्याच झालेल्या एल.एल.बी परीक्षेत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे या उल्लेखनीय यशामुळे सिद्धी भिसे वकिलीसाठी पात्र झाली आहे.

संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर,न्यायमूर्ती अभय ओक,न्यायमूर्ती संतोष चपळगावकर, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आदी मान्यवर तसेच विद्यापीठाचे कुलगुरू तथा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते.

img 20251020 wa0002

सिद्धीचे माध्यमिक शिक्षण मंगल इंग्लिश मिडीयम स्कूल कुर्डूवाडी तर उच्च माध्यमिक शिक्षण के. एन. भिसे कॉलेज कुर्डुवाडी येथे झाले आहे त्यानंतर कायद्याचे शिक्षण संभाजीनगर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठातून पूर्ण केले आहे.सिद्धी यांनी मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष तथा नामवंत वकील उदय वारुंजेकर यांच्याकडे इंटरशिप केलेली आहे.

सध्या त्यांचे पुढील विधी क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण (L.L.M.) महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर येथे सुरु असून भविष्यात त्या न्याय प्रक्रियेत सर्व सामन्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सिद्धी ही माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शामसुंदर भिसे यांची कन्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *