जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

मातोश्री विद्यालयाचे घवघवीत यश, १०० टक्के निकाल.

1 min read

म्हैसगाव : सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर संचलित मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव (ता.माढा) या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

याठिकाणी इयत्ता दहावीमध्ये ३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. ३२ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८०-९० टक्के पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली दिसून येते.

विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
कु.मुस्कान अतीक महाजन-९१.६०%
कु.सानिका भारत सातव ९०.२०%
कु.समृद्धी पोपट सातव ८७.००%
कु. अल्फीजा अनवर महाजन ८२.२०%
चि. रुद्रप्रताप सचिन सातव ८०.००%

७५% पुढील विद्यार्थी संख्या -१२
७०% पुढील विद्यार्थी संख्या-०६
६०% पुढील विद्यार्थी संख्या ०४

संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण श्री.अण्णासाहेब भालशंकर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.रमेश लोखंडे, संस्थेचे कोषाध्यक्ष बोधीप्रकाश गायकवाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विनोद वर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed