जनसंवाद

लोकशाहीचा बुलंद आवाज!

‘पहाट’ उपक्रमांतर्गत कुर्डूवाडी येथील कुबेर मंगल कार्यालयात आदिवासी विकास मार्गदर्शन शिबिर संपन्न.

1 min read
img 20260226 120157
  • पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याची केली वार्षिक तपासणी.

  • पहाट कार्यक्रमात पारधी समाजाला मार्गदर्शन आणि जात प्रमाणपत्र वाटप.

  • नो डिजे नो डॉल्बी संकल्पनेच्या पुरस्कर्त्या मंडळांचा सन्मान.

  • गहाळ झालेले १० मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ धारकांना परत देण्यात पोलिसांना यश

  • भेंड येथे पोलिस अधीक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण

जनसंवाद | कुर्डुवाडी/सोलापूर: कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथे वार्षिक तपासणी निमित्ताने अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी भेट देऊन वार्षिक तपासणी केली. तपासणीनंतर ‘पहाट’ उपक्रमांतर्गत कुर्डूवाडी (Kurduwadi) येथील कुबेर मंगल कार्यालयात आदिवासी विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये आधार कार्ड, जात प्रमाणपत्र व इतर शासकीय दाखले काढण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कौशल्य विकास कार्यक्रम व पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान गरजू ९ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील शिवजयंती उत्सव “नो डीजे – नो डॉल्बी” (No DJ No Dolby) या संकल्पनेतून पारंपारिक वाद्यांसह शांततेत व सांस्कृतिक पद्धतीने साजरा करणाऱ्या ११ शिवजयंती उत्सव मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कुर्डूवाडी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईल फोन पैकी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध लावण्यात आलेले १० मोबाईल त्यांच्या मूळ धारकांना परत देण्यात आले. या कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक यांनी मौजे भेंड येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या कार्यक्रमास अंजना कृष्णा, व्ही.एस. (Anjana Krishna V.S) सहाय्यक पोलीस अधीक्षक करमाळा उपविभाग, श्री. अतुल मोहिते (Atul Mohite) पोलीस निरीक्षक कुर्डूवाडी पोलीस ठाणे, श्री.पांडुरंग भडकवाड, महसूल नायब तहसीलदार माढा, श्री ठोंबरे नायब तहसीलदार प्रांत कार्यालय कुर्डूवाडी, श्री डी. वाय. सरतापे, शिक्षण विस्तार अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर तसेच दीपक शिरोळे, सेंटर इनचार्ज प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहिल्यानगर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *