ताज्या बातम्यामाढा-करमाळारणसंग्रामराजकीय

कुर्डुवाडी नगरपरिषद निवडणूक: लाडक्या बहिणीने भावाला साथ द्यावी – रुपाली चाकणकर

जनसंवाद/ कुर्डूवाडी (प्रतिनिधी शफिक शेख) दि.२४ कुर्डूवाडी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रिपाइं आठवले गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दि 24 रोजी सकाळी ११ च्या सुमारास गांधी चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

आयोजित सभेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले तरुण वर्गाच्या मागणीप्रमाणे रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्थलांतरीत झालेला रेल्वे बोगी बनविण्याचा विभाग परेल येथे गेलेला असल्याने शहरात बेरोजगारी वाढली. स्थानिक बाजारपेठेवर परिणाम झाल्याने शहराची आर्थिक उलाढाल ढासळली. सदरील विभाग किंवा दुसरा एखादा विभाग कुर्डुवाडी कारखाना विस्तारीकारण करिता मी व आठवले साहेब प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी केले.

          भावाने जर बहीणीची पंधराशे रुपयांचा लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ता देऊन काळजी घेतली असेल तर बहीणीचं कर्तव्य आहे भावाला पुन्हा एकदा साथ देण्याची गरज आहे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. कुर्डुवाडी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे रुपालीताई चाकणकर यांनी मतदारांना आवाहन केले.

         शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मूलभूत सोई सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनस्तरावरून अजितदादा व सुनिल तटकरेच्या माध्यमातून जेवढा जास्त निधी मिळवता येईल तेवढा मिळवून देउन शहराच्या सौंदर्यात भर पाडणार असल्याचे मा.आ.संजयमामा शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

 

         यावेळी व्यासपीठावर वामन उबाळे माजी नगराध्यक्ष निवृत्ती गोरे शहराध्यक्ष दत्ताजी काकडे उद्योजक महेश गांधी सूर्यकांत गोरे आकाश जगताप संजय अस्वरे यांच्यासह नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *