कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 साठी सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगाम सन 2025-26 करिता कोल्हापूर जिल्ह्यात अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यास मान्यता देण्यात आली असून जास्तीत जास्त शेतक-यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय अंतिम मुदत पुढीलप्रमाणे-
हरभरा– करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, शिरोळ, पन्हाळा व शाहुवाडी असून सर्वांसाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर आहे.
उन्हाळी भुईमूगसाठी करवीर, गगनबावडा, पन्हाळा राधानगरी, कागल, भुदरगड ही अधिसुचित मंडळे असून यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2026 असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.