कृषीताज्या बातम्यासरकारी योजनासोलापूर जिल्हा

सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दिनांक 3 (जिमाका) :- शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-याकरिता निधी उपलब्ध आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन बाबीकरिता अर्ज मागविण्यासाठी दि. 03 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

            या अनु.जाती व जमाती शेतक-यांनी जास्तीत जास्त प्रमाणात महाडीबीटी पोर्टलवर योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *