ताज्या बातम्यासोलापूरसोलापूर जिल्हा

लोकशाही दिनात 16 शासकीय कार्यालयाकडे 31 तक्रार अर्ज प्राप्त

सोलापूर, दिनांक 3 (जिमाका):- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील 16 शासकीय कार्यालयात च्या 31 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले.

लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे:- जिल्हा पुरवठा कार्यालय-01 , लिड बँक- 02, राज्य परिवहन महामंडळ-02, तहसिलदार मोहोळ- 4,सिव्हील हॉस्पिटल-01, जिल्हा परिषद- 05, तहसिल माढा- 02, महसूल-02, तहसिल उत्तर-01, आस्थापना शाखा- 04, सोलापूर महापालिका- 01, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण – 1, तहसिलदार करमाळा- 2, तहसिल मंगळवेढा-01, भूसंपादन समन्वय-01, तहसिल बार्शी – 01 अशा एकुण 31 तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *