ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 अंतिम आरक्षण जाहीर

रायगड-अलिबाग,दि.03(जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 चे अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून शासन आदेशान्वये जिल्हा परिषद निवडणूक विभागाची व पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची अंतिम आरक्षणाची अधिसूचना दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

       या आरक्षण कार्यक्रमानुसार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या व पंचायत समितीच्या निर्वाचक गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, प्रारुप आरक्षणाची अधिसूचना दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. दि. 14 ऑक्टोबर ते दि.17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रारुप आरक्षण अधिसूचनेवरील हरकती व सूचना स्विकारण्यात आल्या आहेत.

      ही अंतिम आरक्षण यादी संबधित कार्यालयाच्या सूचना फलकावर, जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व पंचायत समित्यांच्या कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *