सोलापूर दि. 20 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथील मॉडेल करिअर सेंटर येथे शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांकरीता “ जागेवर निवड संधी ” (PLACEMENT DRIVE) चे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर “ जागेवर निवड संधी ” (PLACEMENT DRIVE) मध्ये जिल्ह्यातील लिनीत एक्सपोर्ट प्रा.लि. सोलापूर आणि व्ही ट्रान्स एलिव्हेटर प्रा. लि. सोलापूर या दोन कंपनीचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एकुण 60 उमेदवारांची निवड करणार आहेत. या “ जागेवर निवड संधी ” (PLACEMENT DRIVE) मध्ये आय.टी.आय, फिटर, टर्नर, मशिनिस्ट व मेन्टेनन्स इत्यादी प्रकारच्या 18 ते 35 वयोगटातील शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना जागेवर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी नोंदणी करावी. तसेच सदर प्लेसमेंट ड्राईव्ह साठी ऑनलाईन नोंदणी न केलेले उमेदवारही उपस्थित राहू शकतात. उक्त नमुद ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देण्यात याव्या. तसेच www.ncs.gov.in या वेबसाईटवर जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा व संधीचा लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करून रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0217-2992956 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे.